Advertisement

राज्यव्यापी अमित शहांचा दौरा होताच भाजपला बळ विधानसभा निवडणुकीसाठी वेगवेगळ्या समित्यांची घोषणा

प्रजापत्र | Wednesday, 11/09/2024
बातमी शेअर करा

मुंबई दि. १० ९प्रतिनिधी ) महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीच्या चर्चा सुरु आहेत. लवकरच विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. महायुती, महाविकास आघाडी आणि इतर महत्त्वाचे पक्ष आतापासूनच विविध प्लॅन आखताना दिसत आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह  यांचा कालच मुंबई दौरा झाला. मुंबईतील काही गणपती बाप्पांचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी महायुतीच्या महत्त्वाच्या नेतेमंडळींशी चर्चा केली. अमित शाहांच्या कालच्या दौऱ्यानंतर आज भाजपा 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये आली असून, त्यांनी विधानसभेसाठी 'नवा प्लॅन' जाहीर केला आहे.
 आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी मंगळवारी दिली. त्यांना या समितीचे अध्यक्ष करण्यात आले आहे. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन करण्याच्या निर्धाराने पक्ष कार्यकर्ते सज्ज झाले आहेत, असेही यावेळी दानवे यांनी नमूद केले.
दानवे म्हणाले, "बूथपर्यंतची यंत्रणा सक्षम करण्यासाठी पक्षातर्फे ही व्यवस्थापन समिती तयार करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीचे नियोजन, संचलन करण्यासाठी प्रदेश, जिल्हा, तालुका स्तरावर अधिवेशने झाली आहेत. विधानसभा निवडणूक व्यवस्थापन समिती अंतर्गत विविध स्तरांवर समित्या गठित करण्यात आल्या आहेत. अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप कांबळे, अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते, आ. श्रीकांत भारतीय यांची सहसंयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
विशेष आमंत्रित म्हणून केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे, माजी मंत्री गणेश नाईक, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पदसिद्ध सदस्य म्हणून प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर, विक्रांत पाटील, माधवी नाईक, विजय चौधरी आणि संजय केनेकर काम पाहणार आहेत.
---
विविध समित्यांचे प्रमुख
जाहीरनामा समिती-   सुधीर मुनगंटीवार
विशेष संपर्क- चंद्रकांत  पाटील
सामाजिक संपर्क-  पंकजा मुंडे
महिला संपर्क-   विजया रहाटकर
कृषी क्षेत्र संपर्क- खा. अशोक चव्हाण
लाभार्थी संपर्क-   राधाकृष्ण विखे पाटील
युवा संपर्क-  रक्षा खडसे
प्रचार यंत्रणा-   रवींद्र चव्हाण
सहकार क्षेत्र संपर्क-  प्रवीण दरेकर
मीडिया- आ.अतुल भातखळकर
ग्रामीण व शहरी स्थानिक स्वराज्य संस्था संपर्क-   मुरलीधर मोहोळ
अनुसूचित जाती संपर्क-  भाई गिरकर
अनुसूचित जमाती संपर्क-  विजयकुमार गावित
सोशल मीडिया- आ. निरंजन डावखरे
निवडणूक आयोग संपर्क-  किरीट सोमय्या
महायुती निवडणूक अभियान समन्वयक-   गिरीश महाजन

Advertisement

Advertisement