मुंबई- ‘सणासुदीच्या दिवसांत महागाई गगनाला भिडल्याने सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक गणित बिघडले आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस, भाज्या, धान्य सर्वांच्याच किमती प्रचंड वाढल्या आहेत. गृहिणींना घर चालवणे कठीण झाले आहे.
निवडणुकीच्या तोंडावर महागाई कमी करण्याचे आश्वासन देऊन भारतीय जनता पक्ष महिलांची फसवणूक करत आहे. महागाईमुळे सण, उत्सवाचा रंग फिका पडला आहे. या महागाईने जनता त्रस्त आहे म्हणून भाजप सरकारला जाग आणण्यासाठी महिला काँग्रेसच्या वतीने राज्यभरात ‘खर्चे पे चर्चा’ मोहीम राबविण्यात येणार आहे, ’’ अशी माहिती महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा अलका लांबा यांनी दिली.
बातमी शेअर करा