Advertisement

एसपींचे आदेश 'हॅंग' वर ठेवत 'एलसीबी' मध्येच बस्तान

प्रजापत्र | Wednesday, 04/09/2024
बातमी शेअर करा

बीड दि.४(प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षकांचे आदेश जिल्हा पोलीस दलात महत्वाचे मानले जात असले तरी या आदेशांना धाब्यावर बसविण्याचा श्री'गणेशा' कायम एलसीबीकडूनच होत आला आहे. दीड महिन्यापूर्वी या शाखेतून अनालिसिस (विश्लेषण) शाखेत बदली झालेल्या कर्मचाऱ्याने चक्क एसपींचे आदेश 'हॅंग' करत एलसीबीमध्येच मुक्काम ठोकला आहे. 
     बीडचे तत्कालीन पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दीड महिन्यापूर्वी जिल्हा पोलीस दलातील बदल्या केल्या होत्या.त्यावेळी त्यांनी एलसीबीला आपली जहागिरी समजणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना तेथून हलविले.यातील एकाला अनालिसिस (विश्लेषण) शाखेत नियुक्ती दिली.मात्र चक्क एसपींचे देखील आदेश धाब्यावर बसविण्याचा श्री'गणेशा' याच कर्मचाऱ्याने केले.विश्लेषण शाखेत जाण्याऐवजी त्याने तब्बल दीड महिन्यापासून एसपींचे आदेश 'हॅंग' केले आहेत. आपली पोलीस दलातील नियुक्तीच जणू केवळ एलसीबीसाठीच आहे अशा मानसिकतेत काही मस्तवाल कर्मचारी आहेत.त्यातूनच मग आपले बस्तान कायम रहावे यासाठी वरिष्ठांच्या कानाला लागून आपला स्वार्थ साधण्याचा प्रकार हे कर्मचारी करित असून यामुळे पोलीस दलाच्या शिस्तीलाही धक्का लागत आहे.

 

Advertisement

Advertisement