Advertisement

  येत्या २४ तासांत राज्यातील 'या' भागांत मुसळधार पावसाचा इशारा

प्रजापत्र | Monday, 02/09/2024
बातमी शेअर करा

मुंबई- येत्या २४ तासांत राज्यातील विदर्भ, मराठवाड्याचा काही भाग, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावासची शक्यता आहे. काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने आज (दि.२ सप्टें) दिलेल्या बुलेटीनमध्ये वर्तवली आहे.

 

 

पूर्व विदर्भ आणि लगतच्या तेलंगणामध्ये असलेला कमी दाबाचा पट्टा पुढे सरकरण्याची शक्यता आहे. येत्या १२ तासांत हा कमी दाबाचा पट्टा वायव्य दिशेला सरकरण्याने राज्यातील बहुतांशी भागात मुसळधार पाऊस पडण्याचे शक्यता आहे, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.नैऋत्य मान्सून उत्तर मध्य महाराष्ट्रात सक्रिय झाला आहे. मराठवाड्यात नैऋत्य मोसमी पावसाने जोर धरला होता. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. मराठवाड्यातील काही ठिकाणी, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि गुजरात प्रदेशात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला.

मराठवाड्यात काही ठिकाणी, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि गुजरात प्रदेशात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि दक्षिण कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी, उत्तरेकडील अनेक ठिकाणी पाऊस झाला. कोकण आणि उत्तर, मध्य महाराष्ट्र आणि गुजरातमधील काही ठिकाणी आणि सौराष्ट्र, कच्छमध्ये वेगळ्या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस झाला आहे.

Advertisement

Advertisement