Advertisement

बीड जिल्ह्यात संततधार 

प्रजापत्र | Sunday, 01/09/2024
बातमी शेअर करा

बीड दि.०१ (प्रतिनिधी) – बीड शहरासह जिल्हाभरात दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. आज (दि.०१) रविवार रोजी सकाळपासून पावसाने जिल्हाभर सर्वदुर हजेरी लावली असुन नदी, नाले वाहू लागले आहेत. बीड शहरापासून जवळच असलेल्या बिंदुसरा प्रकल्पासह माजलगाव येथील माजलगाव धरणात पाण्याची आवक वाढली आहे.

 

 

 

जिल्ह्यातील पावसाची वार्षिक सरासरी ५६६.१ मिमी असुन आत्तापर्यंत ५६३.६ मिमी पावसाची नोंद झाली असुन जुन ते १ सप्टेंबरपर्यंत ९९.६ टक्के पाऊस झाला आहे. जिल्हा वार्षिक सरासरी ओलांडण्याच्या उंबरठ्यावर असुन काल रात्रीपासून आज पहाटेपर्यंत ३.५ मिलीमिटर पाऊस झाला आहे. दरम्यान बिंदुसरा प्रकल्प पुर्णपणे भरले असुन ओसंडून वाहू लागला आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास बिंदुसरा नदीला पुर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बिंदुसरा नदीकाठी राहणाऱ्या नागरीकांना नगर पालिकेने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुर नियंत्रण रेषेत राहणाऱ्या नागरीकांनी तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, कुठल्याही प्रकारची जीवीत व वित्त हानी होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन नगर पालिकेच्या मुख्याधिकारी निता अंधारे आणि बीड तहसीलदारांनी केले आहे. नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्याबाबतची अनाऊंसमेंट शहरातील प्रत्येक भागात नगर पालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

Advertisement

Advertisement