Advertisement

उदगीर विधानसभेची जागा ही भारतीय जनता पक्षाचीच- अमोल निडवदे

प्रजापत्र | Saturday, 31/08/2024
बातमी शेअर करा

उदगीर दि.३१ (प्रतिनिधी)- उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे प्राबल्य असून हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचा गड मानला जातो त्यामुळे ही जागा २०२४ मध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचाच हाक्क असेल असेल असे भारतीय जनता युवा मोर्चा लातूर जिल्हा अध्यक्ष अमोल निडवदे यांनी सांगितले.

 

१९९९ पासून ते २०१९ पर्यंत पाच विधानसभा निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये तीन वेळेस भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून गेले आणि दोन वेळेस भारतीय जनता पक्षाचा उमेदवार खूप कमी मतांनी पराभूत झाला असे चित्र आहे २०००४ ला तर के केवळ तीन हजाराच्या फरकाने निसटता पराभव भाजपचा झाला. या सगळ्या आकडेवारी वरून सिद्ध होते की उदगीर विधानसभा हा भाजपचा बालेकिल्ला आहे आणि ही जागा भारतीय जनता पक्षानेच लढवावी अशी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. उदगीर विधानसभेसाठी भाजप कडून अनेक जण इच्छुक आहेत त्यात प्रामुख्याने भाजपा ज्येष्ठ नेते पंडित सूर्यवंशी,प्रदेश सचिव बालाजी गवारे ज्यांनी अल्पावधीत प्रचंड लोकप्रियता मिळविली असे युवा नेतृत्व  विश्वजित गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड यांच्यासह युवा मोर्चाचे जिल्हा सचिव साधूराम कांबळे, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख प्रसाद नाईकवाडे हे सुद्धा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.उदगीर विधानसभेतील उदगीर आणि जळकोट तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्ष वाढविण्यासाठी अनेक कार्यकर्त्याने योगदान दिले आहे. वाडी,वस्थी तांड्यापर्यंत पक्ष नेला त्यांची ही मेहनत आम्ही वाया जाऊ देणार नाही, ही जागा भाजपच लढवेल असा विश्वास अमोल निडवदे यांनी व्यक्त केला आहे.
 

Advertisement

Advertisement