Advertisement

कुंडलीक खांडेंना जामीन, पण....

प्रजापत्र | Wednesday, 28/08/2024
बातमी शेअर करा

बीड: शिवसेना उपजिल्हाप्रमुखावरील हल्ला प्रकरणात तब्बल दोन महिन्यांपासून कोठडीत असलेल्या कुंडलीक खांडे यांना अखेर उच्च न्यायालयात दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने खांडे यांना जामीन मंजूर केला आहे. शिवसेना उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांच्यावर हल्ला प्रकरणात दाखल गुन्हयात कुंडलीक खांडे यांना दोन महिन्यापुर्वी अटक झाली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. जिल्हा न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळल्यानंतर त्यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने न्या. शिवकुमार डिगे यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणातील युक्तीवाद २२ तारखेलाच पुर्ण झाला होता. न्यायालयाने हे प्रकरण निर्णयासाठी राखून ठेवले होते. त्यावर आज न्यायालयाने निर्णय देत कुंडलीक खांडे यांना जामीन मंजूर केला. खांडे यांना जामीन मंजूर झाला असला तरी या प्रकरणाची सुनावणी सुरु होईपर्यंत त्यांना त्यांच्या स्वतःच्या गावात जाण्यास मात्र बंदी घालण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement