Advertisement

भर पावसात शरद पवारांचे आंदोलन

प्रजापत्र | Saturday, 24/08/2024
बातमी शेअर करा

बदलापूरमधील लहान मुलींवरील अत्याचाराच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात निषेध आंदोलन करण्यात आले.पुणे, छत्रपती संभाजीनगर, मुंबई अशा प्रमुख शहरांत महाविकास आघाडीच्या घटकपक्षांकडून हे आंदोलन करण्यात येत आहे.पुण्यात खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आले.

 

या आंदोलनादरम्यान पुण्यात पावासाला सुरुवात झाली. पण पावसाला न जुमानता राष्ट्रवादी (शरद पवार गट), काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते आंदोलनस्थळी बसले होते.यावेळी आंदोलकांच्या दंडावर काळ्या फिती होत्या. पाऊस बरसत असताना शरद पवार आंदोलनच्या ठिकाणी बसले होते.तर सुप्रिया सुळे यादेखील भर पावसात आंदोलनाच्या ठिकाणीच बसले होते. भर पावसात सुप्रिया सुळे डोक्यावर पदर घेऊन बसल्या होत्या.या आंदोलनादरम्यान पुण्यात पावासाला सुरुवात झाली. पण पावसाला न जुमानता राष्ट्रवादी (शरद पवार गट), काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते आंदोलनस्थळी बसले होते. पुण्यात खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आले.निषेध आंदोलनात शरद पवार यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी राज्यात महिलांवरील आत्याचार वाढत आहेत, असे म्हटले.शरद पवार तसेच उपस्थित आंदोलकांनी यावेळी मुलगा आणि मुलगी असा भेद करणार नाही, अशी शपथ घेतली. यावेळी मोठ्या संख्येने आंदोलक उपस्थित होते.
 

Advertisement

Advertisement