बीड दि.२३ (प्रतिनिधी)- बीड नाथापूर रोडवरील उमरी फाटा या ठिकाणी दोन दुचाकीचा समोरासमोर अपघात होऊन एकजण जागीच ठार झाल्याची घटना (दि.२३) रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली.
अधिक माहिती अशी कि , बीड-नाथापूर रस्त्यावर दुपारी दीडच्या सुमारास लक्ष्मण मस्के रा. राक्षसभुवन हे दुचाकी वरून जात असताना दुसर्या बाजूने आलेल्या भरधाव आलेल्या दुचाकीची समोरा समोर जोरदार धडक झाली. यामध्ये लक्ष्मण मस्के यांचा जागीच मृत्यु झाला. तर दुसरा मोटारसायकलस्वार हा घटनास्थळावरून पळून गेला. तेथील लोकांनी लक्ष्मण मस्के यांना रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता .
बातमी शेअर करा