Advertisement

बदलापूर अत्याचार प्रकरण;अक्षय शिंदेच्या अडचणी वाढल्या

प्रजापत्र | Wednesday, 21/08/2024
बातमी शेअर करा

ठाणे- जिल्ह्यातील बदलापूर शहरातील एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण करण्यात आले आहे. यानंतर या विरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली. यात आरोपीला फाशीची मागणी केली आहे. हे प्रकरण गंभीर असल्याने कल्याण बार असोसिएशनशी संलग्न असलेल्या वकिलांनी एक निर्णय घेतला. त्यांच्या निर्णयाचे कौतुक करण्यात येत आहे. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचे वकीलपत्र घेण्यास वकिलांनी नकार दिला आहे.

 

 

या प्रकरणी कल्याण बार असोसिएशनशी संलग्न असलेल्या वकिलांनी सांगितले की, आरोपी अक्षय शिंदेचा न्यायालयात बचाव करणार नाहीत. यानंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीच्या पोलीस कोठडीत २६ ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. गेल्या आठवड्यात ज्या शाळेत ही घटना घडली त्या शाळेत परिचर म्हणून कार्यरत असलेल्या आरोपीला बुधवारी सकाळी कडेकोट पोलीस बंदोबस्तात जिल्ह्यातील कल्याण येथील दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले.

न्यायालयाने त्याची पोलीस कोठडी २६ ऑगस्टपर्यंत वाढविण्याचे आदेश दिलेय त्यानंतर पोलिसांनी त्याला एका व्हॅनमधून नेले, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

Advertisement

Advertisement