दिल्ली- कोलकाता येथील आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि त्यानंतर तिच्या निर्घृण हत्येच्या घटनेने देशभर खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जातो आहे. या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यासाठी देशभरात निर्देशनेही केली जात आहेत. दरम्यान, आता सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणाची दखल घेतली असून लवकरच यावर सुनावणी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून याप्रकरणाची दखल घेतली आहे. यावर २० ऑगस्ट रोजी सुनावणी पार पडणार आहे. ही सुनावणी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जे.बी. पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर पार पडणार असल्याची माहिती आहे.
बातमी शेअर करा