बीड दि.14 (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यात वाळू माफियांनी प्रशासनाला आव्हान दिलेले असतानाच आता प्रशासन वाळू माफिया आणि त्यांच्याशी लागेबांधे असलेल्रा पोलीस आणि महसुलाच्या कर्मचार्रांवर कारवाई करीत नसल्याने थेट आमदारांनीच उपोषणाचा इशारा दिला आहे.गेवराई तालुक्यातील गंगावाडी येथे शेतकर्राला चिरडण्याच्या प्रकरणात दोषी कर्मचार्रांवर कारवाई करावी यासाठी आ. लक्ष्मण पवार यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.
बीड जिल्ह्यात त्यातही गेवराई तालुक्यात वाळूची तस्करी हा कळीचा मुद्दा बनला आहे. काही दिवसांपूर्वी वाळू तस्करी करणाऱ्या वाहनाने गंगावाडी येथे शेतकर्राला चिरडल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणात तलाठ्यावर कारवाई झाली, मात्र पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली नाही. ती कारवाई तसेच वाळू माफियांना माहिती देणाऱ्या कर्मचार्रांचे कॉल रेकॉर्ड तपासावेत आणि गेवराई तालुक्यातून होणार अवैध वाळू उपसा थांबवावा, लिलावाची प्रक्रिया सोपी करावी आदी मागण्या करत आ. लक्ष्मण पवार यांनी 19 जानेवारी रोजी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
बातमी शेअर करा