दिल्ली- कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी सीबीआयने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा जामीन नाकारला आहे. तर सीबीआयला शुक्रवार २३ ऑगस्टपर्यंत 'उत्तर द्या' नोटीस बजावली आहे. केजरीवाल यांच्या सीबीआय अटकेविरोधात आज (दि. १४ ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.
कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी सीबीआयने केलेल्या केजरीवाल यांच्या अटकेला जामीन मिळावा या याचिकेवर बुधवारी (दि.१४ ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. केजरीवाल यांनी केंद्रीय एजन्सीद्वारे केलेल्या अटकेला आव्हान देणारी स्वतंत्र याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. यावर आज न्यायमूर्ती सूर्यकांत आणि उज्वल भुयान यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने 'सध्या तरी अंतरिम जामीन नाही' असे स्पष्ट करत सीबीआयला शुक्रवार २३ ऑगस्टपर्यंत 'उत्तर द्या' नोटीस जारी केली आहे. यानंतर पुढील सुनावणी होणार आहे.