औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव करण्याचा राज्य सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज (शुक्रवार) वैध ठरवला आहे. नामांतराला काही जणांचा विरोध आणि काहींचा पाठिंबा असणारच असे सांगून न्यायालयाने नामांतर प्रक्रीयेत हस्तक्षेपास नकार दिला आहे.
न्या. हृषिकेष रॉय आणि न्या. भाटी यांच्या खंडपीठाने हा निर्णय देत मुंबई उच्च् न्यायालयाने या अनुषंगाने दिलेला निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे. नामांतराच्या निर्णयामुळे कुठेही तणाव पसरला नाही असे निरिक्षण न्यायालयाने नोंदविले आहे.
बातमी शेअर करा