बीड- जिल्हयात कोरोना रूग्णांची संख्या बुधवारी (दि. १३) वाढली असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आले. मागील काही दिवसांपासून कोरोनाची रुग्ण कमी अधिक प्रमाणात वाढू लागल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आले.जिल्ह्यात आज ५४ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून यात बीडमध्ये सर्वाधिक २६ जणांचा समावेश आहे.तर अंबाजोगाई ४,आष्टी ८,गेवराई ३,केज ४,माजलगाव १,परळी ३,पाटोदा ३,शिरूर १ तर वडवणी १ रुग्ण आढळून आला. दरम्यान यावेळी ६४५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
बातमी शेअर करा