Advertisement

बारामतीत 'तुतारी' चिन्हावर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण

प्रजापत्र | Tuesday, 23/04/2024
बातमी शेअर करा

बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे राहिलेले अपक्ष उमेदवार शेख सोहेलशहा युनुसशहा यांना तुतारी चिन्ह देण्यात आले आहे. या चिन्हावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी आक्षेप घेतला आहे. सुप्रिया सुळे यांच्या प्रतिनिधींचा तुतारी चिन्हाचा आक्षेप निवडणूक आयोगाने फोटाळून लावला आहे. तुतारी चिन्ह आणि तुतारी वाजवणारा माणूस हे दोन वेगवेगळे चिन्ह असल्याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिले आहे.

 

 

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मुख्य निवडणूक अधिकारी कविता द्विवेदी यांनी सुप्रिया सुळे यांचा आक्षेप फेटाळून लावला. त्यांनी परिपत्रकाद्वारे यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की, अपक्ष उमेदवार शेख सोयलशहा युनुसशहा यांना अराखीव/ खुल्या चिन्हांपैकी तुतारी हे चिन्ह त्यांनी मागणी केलेले पसंतीक्रमानुसार नेमून देण्यात आले आहे. या चिन्हाबाबत आपण चिन्ह वाटप बैठकीमध्ये आक्षेप घेतला होता. त्यावेळी आपणास प्रस्तुत चिन्ह हे भारतीय निवडणूक आयोगाने निर्धारित करून दिले असल्याने त्यामध्ये कोणतेही बदल करण्याचा अधिकार नसल्याचेही स्पष्ट केले आहे. दोन्ही चिन्हांच्या प्रतिकृती वेगवेगळ्या असून मरीठीतील नावेही भिन्न आहेत. त्यामुळे आपल्या आक्षेपाशी असहमत असून आपला आक्षेप अमान्य करण्यात येत आहे.', असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

 

 

निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, 'तुतारी आणि ट्रमपेट चिन्हावरून वाद झाला. बारामती लोकसभा मतदार संघात अपक्ष उमेदवारला ट्रमपेट चिन्ह देण्यात आले आहे. ट्रम्पपेटला मराठीत तुतारी म्हटले जात असल्याचा हरकत शरद पवार गटाने घेतला आहे.पण ही हरकत निवडणूक आयोगाने अमान्य केली आहे. निवडणूक आयोगाने सुप्रिया सुळे यांना पत्राद्वारे कळविले आहे.'

 

 

दरम्यान, बारामती लोकसभा मतदार संघातील तुतारी या चिन्हावरील वादावर सुप्रिया सुळे यांनी पुण्यामध्ये भाषण करताना प्रतिक्रिया दिली आहे. 'हे आमच्या विरोधात षडयंत्र आहे का? हे फक्त महाराष्ट्रात होतंय. आम्ही नेहमी नियम कायदे पळतो. एक महिन्यापूर्वी आम्ही निवडणूक आयोगाला सांगितलं होतं.' असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement