Advertisement

पंतप्रधान मोदींना मागे टाकत राहुल गांधी आघाडीवर

प्रजापत्र | Saturday, 20/04/2024
बातमी शेअर करा

 दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे युट्युब चॅनेल हे राजकीय पक्ष व नेत्यांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असल्याचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या रिपोर्टमध्ये ६ एप्रिल ते १२ एप्रिलच्या आठवड्यातील राजकीय पक्ष व नेत्यांच्या युट्युब चॅनेलला मिळालेल्या दर्शकांची संख्या प्रसिद्ध करण्यात आली आहे. राजकीय पक्ष व राजकीय नेते गटातील एकूण दर्शकांपैकी तब्बल ३१ टक्के दर्शक हे राहुल गांधी यांचे युट्युब चॅनेल पाहत असल्याचे दिसून आले आहे. देशातील सर्वाधिक लोकप्रिय नेते असलेले नरेंद्र मोदी यांचेही युट्युब चॅनेल आहे. त्यांचे सबस्क्राईबर सुद्धा राहुल गांधी यांच्यापेक्षा कितीतरी अधिक आहेत. परंतु त्यांचे युट्युब चॅनेल एकूण दर्शकांपैकी केवळ ९ टक्के दर्शक पाहतात.

Advertisement

Advertisement