बीड- बीड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसंग्रामच्या नेत्या डॉ. ज्योती मेटे काय भूमिका घेणार याकडे जिल्हयाचे लक्ष होते. त्यावर आता त्यांनी लोकसभा निवडणुक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. ज्योती मेटे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपली भूमिका जाहीर केली. मराठा क्रांती मोर्चाच्या काही समन्वयकांच्या उपस्थितीत शिवसंग्राम कार्यालयात माध्यमांशी बोलताना डॉ. ज्योती मेटे म्हणाल्या, ' मी बीड लोकसभा लढवावी ही जनतेची मागणी होती. त्यासाठीच मी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला होता. नंतरच्या घडामोडी सर्वांना माहित आहेत. नंतरच्या काळात मी जनतेशी संवाद साधला. मात्र समाजहित हेच मला सर्वस्व आहे. त्यामुळे आपण निवडणूक लढविणार नसल्याचे मेटे म्हणाल्या. यावेळी मेटे यांच्यासह प्रभाकर कोलंगडे, नारायण काशीद, बी बी जाधव, मंगेश पोकळे, डॉ. प्रमोद शिंदे यांची उपस्थिती होती.