Advertisement

अजित पवार यांच्या 'त्या' वक्तव्याची निवडणूक आयोगाकडून दखल

प्रजापत्र | Friday, 19/04/2024
बातमी शेअर करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अजित पवार यांनी एका प्रचारसभेत केलेल्या वक्तव्याची निवडणूक आयोगाने दखल घेतलीये. राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्या वक्तव्यावर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

 

 

अजित पवारांचं विधान काय होतं?

इंदापूरमध्ये डॉक्टर आणि वकिलांच्या परिषदेत बोलताना अजित पवार यांनी म्हटलं होतं की, काय लागेल को निधी द्यायला सहकार्य करू. पाहिजे तेवढा निधी देतो, पण मशीनमध्ये बटण कचाकचा दाबा, म्हणजे याने मलाही बरे वाटेल. नाही तर निधी मिळाली नाही तर मला बोलू नका, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं.

 

निवडणूक आयोगाने दखल घ्यावी - रोहित पवारांची मागणी

अजित पवारांचं हे वक्तव्य सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं होतं. तसेच राजकीय वर्तुळातही याने खळबळ उडाली. विरोधकांनी याबाबत तक्रार दिली होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या या वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगाने दखल घ्यावी अशी मागणी केली होती.

 

 

अजित पवारांचं स्पष्टीकरण

आपल्या वक्तव्याबाबत अजित पवारांनी स्पष्टीकरण देखील दिलं होतं. माझ्या वाक्यात ध चा मा केला गेला. मी हे सर्व गमतीत म्हटलो होतो. मी कायम विचार करून विचारपुर्वक बोलततो, असं अजित पवार यांनी म्हटलं होतं.

आज राज्यात पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. पहिल्याच दिवशी अजित पवारांच्या या वक्तव्याची निवडणूक आयोगाने दखल घेतलीये. तसेच चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Advertisement

Advertisement