Advertisement

ट्रकने वयोवृद्ध महिलेला चिरडले

प्रजापत्र | Thursday, 18/04/2024
बातमी शेअर करा

बीड दि.१८ (प्रतिनिधी)- गेवराई तालुक्यातील ईटकुर येथील लिंबाबाई शंकर लोंखडे (वय ८०) या रस्त्याच्या कडेला उभा असतांना समोरून येणाऱ्या ट्रकने त्यांना जोराची धडक दिली. यामध्ये लिंबाबाई यांचा जागीच मृत्यू झाला.

  ईटकर येतील रहिवाशी लिंबाबाई शंकर लोखंडे या रस्त्यावर उभा असतांना समोरून येणारा ट्रक क्र.एम.एच.१२ सी.टी.२३७५ ने जोराची धडक दिली असता त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी अद्याप पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली नाही. लिंबाबाई यांच्या मृत्यूने ईटकुर गावात शोककळा पसरली आहे.

 

Advertisement

Advertisement