रत्नागिरी - रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. लोकसभा उमेदवारांची तेरावी यादी आज, गुरुवारी भाजपने जाहीर केली आहे. आता नारायण राणे हे महायुतीचे अधिकृत उमेदवार असतील. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यांचा सामना महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्याशी होणार आहे.
बातमी शेअर करा