Advertisement

पेठ बीडमध्ये जुन्या वादातून एकाला भोसकले

प्रजापत्र | Monday, 15/04/2024
बातमी शेअर करा

बीड दि.१५(प्रतिनिधी)- शहरातील पेठ बीड भागात जुन्या वादातून काल रात्री साडे दहाच्या दरम्यान किराणा दुकानदार शेख जावेद उर्फ बबबू शेख बशिर यास पाच ते सहा जणांनी शिवीगाळ करत तलवार आणि चाकूने पाठीमागून भोसकल्याने ते गंभीर जखमी झाले असुन बीड जिल्हा रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे.

 

सविस्तर माहिती अशी कि,पेठ बीड भागातील आसेफ नगर कॉलनी येथील किराणा दुकान चालवणारे शेख जावेद उर्फ बब्बू शेख बशिर यास यास भागातील इमरान उर्फ शेख पप्पू खलिफा शाह, शेख सोहे शेख समृध्दीम, अफजल कासम, शेख जफर शेख हामीद, शेख सलमान व इतराने तु सय्यद जफर यास दोन दिवसापुर्वी शिवीगाळ का केली याचा जाब विचारत शेख जावेद यास शिवीगाळ करून मारहाण करण्या सुरूवात केली. बाचाबाचीचे रूपांतार नंतर मारामारीत होवून शेख जावेद यास पाठीमागून तलवार आणि चाकून भोसकले यात ते गंभीर जखमी झाले असुन त्यांना उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पेठ बीड पोलीसांनी जिल्हा रूग्णालयात जावून शेख जावेद यांचा जवाब नोंदविल्यानंतर वरील सहा जणांविरूध्द भादंवी कलम ३०७, १४७, १४८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नसुन पुढील तपास पेठ बीड पोलीस करत आहेत. 

Advertisement

Advertisement