Advertisement

गळ्याला चाकू लावून ट्रक चालकाला लुटले !

प्रजापत्र | Sunday, 14/04/2024
बातमी शेअर करा

बीड दि.१४ (प्रतिनिधी) – अज्ञात मोटारसायकल स्वाराने ट्रक चालकाच्या गळ्याला चाकू लावून दमदाटी करत जिवे मारण्याची धमकी देवून १० हजार रूपये लुटल्याची घटना आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास बीड शहराबाहेरून जाणाऱ्या बायपासवर घडली. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ३९२, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

 

 

 

धाराशिव जिल्ह्यातील चिकली येथील सुनिल विष्णू मते (वय ३४) हे ट्रक घेवून बीड बायपासवरून हिरापुरच्या दिशेने जात होते. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास त्यांनी ट्रक रोडच्या कडेला उभा करून ते लघुशंकेसाठी गेले. त्याचवेळी एका मोटारसायकलवर आलेल्या इसमाने गाडी इथे का उभी केलीस असे विचारून मते यांच्या गळ्याला चाकू लावून जिवे मारण्याची धमकी देत त्यांच्या खिश्यातून दहा हजार रूपये काढुन घेतले. यावेळी आरडा ओरडा

केल्यास तुला इथेच जिवे मारून टाकील अशी धमकीही अज्ञात इसमाने दिली. या प्रकरणी सुनिल मते यांच्या फिर्यादीवरून बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात मोटारसायकल स्वराविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान सदरील मोटारसायकलवर नंबर प्लेट नव्हती अशा प्रकारे भर दिवसा लुटीच्या घटना होत असल्याने ग्रामीण पोलीसांपुढे रॉबरी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

Advertisement

Advertisement