गेवराई- तालुक्यात दुपारी ५ वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह सुसाट वारा आणि जोरदार पाऊस झाला. यामध्ये मन्यारवाडी येथील महिलेच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला तर पंधरा वर्षाचा मुलगा जखमी झाला आहे.
गेवराई शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मन्यारवाडी शिवारातील आपल्या शेतात आई व मुलगा शेती काम करत असताना आज दुपारी ४ च्या सुमारास त्यांच्या अंगावर विज पडली. या घटनेत मिना गणेश शिंदे (वय ३५) यांचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा ओंकार गणेश शिंदे (वय १५) हा गंभीररित्या जखमी झाला आहे. जखमी मुलास गेवराई येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. मन्यारवाडी येथील झालेल्या या घटनेने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
बातमी शेअर करा