Advertisement

घाटावरील राधिका हॉटेलमध्ये जुगाऱ्यांवर मोठी कारवाई

प्रजापत्र | Friday, 05/04/2024
बातमी शेअर करा

नेकनूर-सहाय्यक पोलीस अधिक्षक कमलेश मीना व नेकनूर पोलिसांनी मांजरसूंबाच्या घाटातील राधिका हॉटेलच्या तळघरात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारून १९ जणांना ताब्यात घेतले आहे.या कारवाई पोलिसांनी तब्बल ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.मागच्या काही दिवसांपासून नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे वाढल्याच्या तक्रारी सुरु होत्या.त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. 
              नेकनूर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांनी जबाबदारी घेतल्यानंतर बालाघाटावर अवैध धंदे वाढल्याच्या चर्चा मागच्या काही दिवसांपासून चांगल्याच वाढल्या होत्या.गोसावी आल्यापासून अवैध धंदे बोकाळल्याचे चित्र होते.त्यापार्श्वभूमीवर  सहाय्यक पोलीस अधिक्षक कमलेश मीना यांना राधिका हॉटेलमध्ये अवैधरित्या जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती मिळाली होती.त्यानुसार मीना व नेकनूर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी,पोलीस उपनिरीक्षक पानपाटील,पोलीस उपनिरीक्षक गटूवार,पोलीस अंमलदार चोपणे,श्री.मुंडे,इनामदार,श्री.वडने,श्री.क्षीरसागर,श्री सातपुते,श्री.राऊत,श्री.ढाकणे यांनी सापळा रचून राधिका हॉटेलवर छापा मारला.यावेळी हॉटेलमध्ये तिरट नावाचा जुगार खेळताना भगवान चंद्रकांत गरड,तात्यासाहेब अंबादास बहिर,अशोक सुधाकर घुले,अनिल ज्ञानोबा करडुले,सदाशिव उत्तम बिक्कड,अनंत शंकर शिनगारे,संदीप पिलाजी गोरे,जगदीश बाबासाहेब जगताप,संतोष अंबादास सोनावणे,किशोर अशोक मोराळे,तात्यासाहेब आत्माराम आमटे,प्रकाश रूपा राठोड,नितीन भगवान शिनगारे,जालिंदर भिवा त्रिमुखे,सुभम सुरेश चव्हाण,योगेश युवराज घुले,भीमा रामकिसन वाघमारे,रामा ज्ञानोबा भोसले,दशरथ राजाराम त्रिमुखे या १९ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.दरम्यान या कारवाई तब्बल ३१ लाख ७४ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून घाटावरील ही कारवाई सर्वात मोठी मानली जात आहे. 

 

लायसन्सचा प्रश्न ऐरणीवर.. 
बीड जिल्ह्यात जुगार अड्डा सर्वत्र सुरु आहे.अनेक ठिकाणी यासाठीची परवाना काही जणांनी काढला आहे.मात्र यातील अनेक परवाने आजघडीला मुदतबाह्य झाले असताना अश्या तरी जुगार अड्ड्यावर पोलीस कारवाई करणार का हाही प्रश्न आहे.राधिका हॉटेलमध्ये अभिनव क्रीडा मंडळच्या वतीने अध्यक्ष व सचिव यांनी परवाना नूतनीकरण न करता नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.  

Advertisement

Advertisement