Advertisement

फडणवीसांवर टीका करताना नाना पटोले यांची घसरली जीभ

प्रजापत्र | Tuesday, 30/04/2024
बातमी शेअर करा

 देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. सभा, प्रचार, दौरे यांना वेग आला आहे. दरम्यान महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या सभा जोरदार सुरू आहेत. दरम्यान अकलूज येथे जाहीर सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी कुणाच्या नादी लागत नाही, कुणाचं वाईट चिंतत नाही, परंतु माझ्यासोबत विश्वासघात केला की, त्यांचा सत्यनाश होतो, माझा इतिहास तपासा’, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं.

 

 

त्याचबरोबर शरद पवारांवर देखील हल्लाबोल केला होता. त्यावरती काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे, त्यावेळी पटोलेंची जीभ घसरली.

'देवेंद्र फडणवीसांना हे बोलण्याचा आधिकार नाही. ते ब्राम्हण आहेत म्हणून त्यांचा शाप आता लागत नाही. ते ओरीजनल ब्राम्हण नाहीत ते मटण खाणारे ब्राम्हण आहेत. तुम्ही २०१४ मध्ये सत्तेत येण्यासाठी जे काही बोलला होतात, धनगरांना न्याय देऊ, मराठ्यांना न्याय देऊ, विविध जातींना न्याय देऊ, कुठं केलं ते सांगा.'

'त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना हे बोलण्याचा आधिकार नाही आणि शाप देण्याचा आधिकार नाही. त्यांनी महाराष्ट्राचा सत्यानाश केला आहे. शाहु. फुले, आंबेडकर यांच्या विचाराला ज्यांनी काळीमा लावण्याचं पाप केलं, त्या फडणवीसांना बोलण्याचा आधिकार नाही पण, ते बोलत आहेत तर बोलू देत, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

Advertisement

Advertisement