Advertisement

कच्च्या सिमेंट रस्त्यावरून ट्रॅक्टर घातले,जाब विचारणार्‍यास केली मारहाण

प्रजापत्र | Friday, 05/04/2024
बातमी शेअर करा

 बीड- सिमेंट रस्त्याचे काम सुरू असतांना त्यावरून कडब्यानी भरलेले ट्रॅक्टर घातले. याचा जाब विचारणार्‍या एकास सहा ते सात जणांने मारहाण करून जखमी केले. तसेच त्याच्या घरावर दगडफेक करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली ही घटना कारेगव्हाण येथे घडली असुन या प्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
     

 

 

बीड तालुक्यातील खंदारे वस्ती कारेगव्हाण येथे सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्यावरून उमेश खंदारे याने कडब्याने भरलेले ट्रॅक्टर घातले. ट्रॅक्टर घातल्याचा सुरेश खंदारे यांनी जाब विचारल्यानंतर त्यास मारहाण करून त्यांच्या घरावर दगडफेक करत जिवे मारण्याची धमकी देण्यात आली या प्रकरणी सुरेश खंदारे यांच्या फिर्यादीवरून उमेश खंदारे, राहुल गित्ते, चिंतामणी खंदारे, बाबु खंदारे, उमेश खंदारे, नितीन खंदारे, वनाबाई खंदारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement