Advertisement

अखेर उस्मानाबाद महायुतीचा उमेदवार ठरला !

प्रजापत्र | Thursday, 04/04/2024
बातमी शेअर करा

 उस्मानाबाद-अखेर महायुतीचा उस्मानाबाद लोकसभा उमेदवार ठरला, जिल्हा परिषदेच्या माजी जिल्हा उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील यांचे नाव जाहीर झाले असून या लोकसभा मतदारसंघात दिर भावजय अशी लढत पाहायला मिळणार, आज राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी अर्चनाताई पाटील यांचे नाव मुंबईत जाहीर केले,अर्चनाताई या भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत तर राज्याचे जेष्ठ नेते डॉ पदमसिंह पाटील यांच्या सून.पाटील यांची उमेदवारी जाहीर होताच धाराशिव शहरात कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.

लोकसभेचा बिगुल वाजूनही बऱ्याच दिवसापासून महायुतीचा उमेदवार ठरत नव्हता दररोज नवीन नाव उमेदवार म्हणून समोर येत होतं त्यामुळे उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीत महायुतीचा उमेदवार कोण असेल याची उत्सुकता शिगेला लागली होती अखेर आज मुंबईत महायुतीचा उमेदवार ठरला असून  अर्चनाताई पाटील या उमेदवार असणार आहेत अर्चनाताई या उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष आहेत आज मुंबईत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत अर्चनाताई पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यानंतर पाटील यांची उमेदवारी तटकरे यांनी जाहीर केली गेल्या लोकसभेला भावा- भावात लढत होती यावेळी दिर-भावजयीत लढत असणार आहे.

 

 

भाजपाकडून डझनपेक्षा जास्त उमेदवार बाशिंग बांधून होते परंतु उस्मानाबाद मतदारसंघ महायुतीमध्ये कोणाकडे जातो हे ठरत नसल्यामुळे महायुतीकडून उमेदवार देण्यास उशीर झाला,आता उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाकडे आल्याने उमेदवार कोण हा पेच होता आता तोही सुटला असून अर्चनाताई पाटील या उस्मानाबाद लोकसभेच्या तिसऱ्या महिला उमेदवार ठरल्या आहेत.

Advertisement

Advertisement