Advertisement

शिवसेनेचे दोन उमेदवार बदलण्यासाठी भाजपचा मुख्यमंत्र्यांवर दबाव

प्रजापत्र | Tuesday, 02/04/2024
बातमी शेअर करा

मुंबई - महायुतीचं जागावाटप अद्याप पूर्ण होऊ शकलेलं नाही. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून जाहीर करण्यात आलेल्या आठ जागांपैकी दोन जागांवरील उमेदवार बदलण्यात यावेत, यासाठी भाजपकडून शिंदे यांच्यावर प्रचंड दबाव असल्याची माहिती आहे. त्यासाठी भाजपकडून अंतर्गत सर्व्हेचा दाखला दिला जात आहे, त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे हे भाजपच्या दबावाला बळी पडून उमेदवार बदलणार की विद्यमान खासदारांना दिलेला शब्द पाळणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे.

 

 

महायुतीमध्ये जागा वाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. सुरुवातीला भारतीय जनता पक्षाकडून शिवसेनेला  कमी जागा देण्याची चर्चा होती. तसेच, शिवसेनेने आपले उमेदवार बदलावेत, यासाठी भाजपाचा आग्रह होता. मात्र, बंडाच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोबत आलेले आमदार आणि खासदार यांना पुन्हा तिकिट देण्याचे आश्वासन दिले होते, त्यामुळे मुख्यमंत्र्यांची मोठी अडचण झाली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दावर ठाम राहत विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आठ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे, त्यात रामटेक- राजू पारवे, बुलडाणा- प्रतापराव जाधव, मावळ- श्रीरंग बारणे, शिर्डी- सदाशिव लोखंडे, हिंगोली- हेमंत पाटील, दक्षिण मध्य मुंबई- राहुल शेवाळे, कोल्हापूर- संजय मंडलिक, हातकणंगले- धैर्यशील माने यांचा समावेश होता.

 

 

भाजपकडून कोल्हापूर, हातकणंगले, हिंगोली या मतदारसंघातील विद्यमान खासदार बदलावेत, अशी सूचना केली होती. मात्र, एकनाथ शिंदेंनी दिलेल्या शब्दाप्रमाणे त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, हिंगोली आणि हातकणंगले मतदारसंघातील भाजपकडून विद्यमान खासदार हेमंत पाटील आणि धैर्यशील माने यांना कडाडून विरोध करताना प्रचार करणार नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे हातकणंगले आणि हिंगोलीतील उमेदवार बदलण्यात यावा, यासाठी मुख्यमंत्री शिंदेंवर भाजपकडून दबाव टाकला जात आहे, 

Advertisement

Advertisement