Advertisement

मराठा आरक्षणासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्याची आत्महत्या

प्रजापत्र | Wednesday, 27/03/2024
बातमी शेअर करा

बीड- राज्य सरकारने मराठा आरक्षणाची घोषणा केली असली तरी याची अद्यापही अंमलबजावणी करण्यात आली नाही. मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत अनेकांनी आत्महत्या केल्या. आज सकाळी एका सतरा वर्षीय महाविद्यालयीन तरुणाने सग्यासोयर्‍याच्या अंमलबजाणीसाठी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना वरवटी येथे घडली. सदरील विद्यार्थ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालय या ठिकाणी आणण्यात आला होता.

 

 

  गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने मराठा समाजालाआरक्षण घोषीत केले, मात्र त्या आरक्षणाची अद्यापपर्यंत अंमलबजावणी झाली नाही. सगेसोयरे याबाबतही शासनाने योग्य तो निर्णय घेतलेला नाही. आरक्षणासाठी आतापर्यंत राज्यातील अनेक तरुणांनी आत्महत्या केल्या. आज सकाळी पुन्हा एका महाविद्यालयीन तरुणाने आत्महत्या करून आपले जीवन संपविले. कुणबीची नोंद सापडत नसल्याने वरवटी येथील सोहम कल्याण शिंदे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा तरुण शहरातील बलभीम महाविद्यालयामध्ये अकरावी वर्गात शिक्षण घेत होता. या घटनेची माहिती गावातील लोकांना झाल्यानंतर अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आला होता.

Advertisement

Advertisement