बीड- शहरापासून जवळच असलेल्या आनंदवाडी येथील १७ वर्षीय तरुणाने शुक्रवारी (दि.२२) दुपारच्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
अधिक माहिती अशी कि, शहरापासून जवळच असलेल्या आनंदवाडी येथील अनिकेत डोईफोडे (वय-१७) या तरुणाने शुक्रवारी (दि.२२) दुपारच्या दम्यान त्याच्या राहत्या घरी फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. फाशी घेतलेली निदर्शनास येताच घरातील सदस्यांनी त्याला जिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. हे पाऊल अनिकेतने का उचलले हे मात्र कळू शकले नाही. मात्र या घटनेने आनंदवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
बातमी शेअर करा