Advertisement

चाळीस बुलेटच्या सायलेन्ससर आणि फॅन्सी नंबर प्लेटवर फिरवला रोडरोलर

प्रजापत्र | Friday, 22/03/2024
बातमी शेअर करा

बीड दि.२२ (प्रतिनिधी) -शहरात कर्कश आवाज आणि नियमांना पायदळी तुडविणाऱ्या ४० बुलेटचे सायलेंस वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष सानप व वाहतूक कर्मचाऱ्यांनी जप्त केले होते.यावेळी फॅन्सी नंबर प्लेट असणाऱ्या जवळपास २०० ते २५० नंबर प्लेटही मागच्या महिन्यात पोलिसांनी काढून घेतल्या होत्या.अखेर शुक्रवारी (दि.२२) सायंकाळी ६ च्या सुमारास अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर, सुभाष सानप व वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपास्थितीत यावर रोडरोलर फिरवून नष्ट करण्यात आले.वाहतूक शाखेच्या या कारवाईची जिल्हाभरात चर्चा होती.  
         मागच्या अनेक महिन्यानंतर वाहतूक शाखेने बीडमध्ये मोठी कारवाई केली आहे.पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी या खात्याची जबाबदारी सुभाष सानप यांच्यावर सोपविण्यात आल्यानंतर त्यांनी बीडमध्ये अनेक मोठया कारवाया करण्यास सुरूवात केली. यात वाहनांना शिस्त, मंडईत अतिक्रमण मुक्त,फळ गाड्या रस्त्याच्या कडेला रहाव्यात यासाठी सातत्याने त्यांनी मोहीम हाती घेतली होती. मागच्या महिन्यात त्यांनी शहरात मोठया आवाजात बुलेट गाड्यांचा त्रास वाढल्याने तब्बल ४० सायलेन्ससर जप्त केले होते. तसेच २०० ते २५० फॅन्सी नंबर प्लेट ही जप्त करण्यात आल्या होत्या. अखेर शुक्रवारी (दि.२२) सायंकाळी या सर्व जप्त केलेल्या वस्तूंवर रोडरोलर फिरवून पोलिसांनी बेशिस्त वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी कारवाईच्या माध्यमातून इशाराच दिला आहे.

Advertisement

Advertisement