Advertisement

कायदा व सुव्यवस्थेतेचे व्हावे पालन

प्रजापत्र | Wednesday, 20/03/2024
बातमी शेअर करा

बीड-आगामी लोकसभा निवडणूका, ईदच्या अनुशंगाने बीड शहर पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.२०) शांतता कमिटीची बैठक पार पडली. यावेळी पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी कायदा,सुव्यवस्थेतेचे पालन करण्यासोबत समाजातील सर्व घटकांनी अधिक सजगतेने राहण्याबाबात आवाहन केले.पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांच्या नियोजनातून ही बैठक आयोजित करण्यात आली होती.यासाठी पोलीस निरीक्षक मारुती खेडकर, शिवाजी बंट्टेवाड, अशोक मुदीराज या ठाणेप्रमुखांची उपस्थिती होती.
       बीडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती. या बैठकीत मार्गदर्शन करताना एसपी ठाकूर यांनी रमजान सुरु असल्याने येत्या काही दिवसांत बशीरगंजमध्ये मिना बाजार सुरु होणार आहे. या बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी होत असते.या काळात वाहनांना जागा पुरेशी नसल्याने वाहतूकीसाठी अडथळा निर्माण होतो.त्यामुळे यावर प्रत्येकाने काळजी घेऊन कोणाची ही गैरसोय होऊ नये यासाठी खबरदारी घ्यायला हवी. तसेच निवडणुकांचा काळ असल्यामुळे प्रत्येकाने सामाजिक एकोपा सांभाळून काळजी घेतली पाहिजे. सण उत्सव साजरा करताना नियमांचे उल्लंघन कुठेही होणार नाही ही खबरदारी घेणे सर्वांचेच कर्तव्य असल्याचे ठाकूर म्हणाले.सोशल मीडियातून अफवा पसरवणाऱ्या, चुकीचे संदेश प्रसारित करणाऱ्या तसेच शांतता भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असा इशारा ही एसपी यांनी दिला.
पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी ही कायदा व सुव्यवस्थेतेच्या दृष्टीकोणातून ही बैठक आयोजित केल्याचे सांगत अफवा पसरवणाऱ्या, चुकीचे संदेश प्रसारित करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील असे सांगितले.
दरम्यान आगामी काळात देखील हिंदू-मुस्लिमांसह सर्व जाती धर्मीय समाज बांधव एकत्र गुण्यागोविंदाने राहणार असून कुठल्याही प्रकारे शहरासह तालुक्याची शांतता भंग न होता सौहार्दाचे वातावरण कायम राहील अशी ग्वाही सर्वधर्मीय समाजबांधव प्रतिनिधींकडून शांतता कमिटीच्या बैठकीत देण्यात आली होती.

Advertisement

Advertisement