Advertisement

कोविशिल्ड लसी बाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय........!

प्रजापत्र | Tuesday, 05/01/2021
बातमी शेअर करा

मुंबई दि.५ - केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता पुढील काही महिन्यांसाठी सीरमला कोव्हिशील्ड लस देशाबाहेर पाठवता येणार नाही. सरकारने या लसीच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.

‘सीरम’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. पूनावाला यांनी विकसनशील देशांसाठी सुमारे 100 कोटी डोस तयार करण्याचा करार केला आहे.आम्ही सध्याच्या घडीला केंद्र सरकारला केवळ लस देऊ शकतो. देशाती प्रत्येक व्यक्तीचे लसीकरण करणे शक्य नाही. आपल्याला प्राधान्यक्रम ठरवावा लागेल, असं अदर पुनावाला यांनी सांगितलं.

           दरम्यान, कोव्हिशील्ड लसीच्या निर्यातीला आता थेट मार्च किंवा एप्रिल महिन्यातच परवानगी मिळू शकते.

हेही वाचा 

Advertisement

Advertisement