Advertisement

बजरंग सोनवणेंचि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी

प्रजापत्र | Wednesday, 20/03/2024
बातमी शेअर करा

 बीड दि. २० (प्रतिनिधी ) : बीड जिल्ह्यातील राजकारणाला धक्के बसायला सुरुवात झाली असून अजित पवार तथा धनंजय मुंडे यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक असलेल्या बजरंग सोनवणे यांनी अखेर अपेक्षेप्रमाणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिट्ठी दिली आहे. सोनवणे यांनी राष्ट्रवादीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे दिला आहे . ते आजच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

 

 

 

बजरंग सोनवणे हे बीड जिल्ह्यातील मात्तबर राजकीय व्यक्तिमत्व आहेत. येडेश्वरी उद्योग समूहाचे अध्यक्ष असलेल्या बजरंग सोनवणे यांनी मागील सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या प्रीतम मुंडे यांना कडवी लढत दिली होती. राष्ट्रवादीचे एक कट्टर कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख राहिलेली होती. मात्र राष्ट्रवादी एकसंघ असताना त्यांना अचानक जिल्हाध्यक्षपदावरून हटविण्यात आले होते, त्याची सल बजरंग सोनवणे यांच्या मनात कायम होती. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर सोनवणे अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यासोबत राहिले मात्र तेथे देखील त्यांच्या कार्यकर्त्यांवर असाच अन्याय होत असल्याची भावना कारकर्त्यानी बोलून दाखविली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता बजरंग सोनवणे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिट्ठी दिली आहे. आज दुपारी त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस -शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होणार आहे.

Advertisement

Advertisement