बीड : निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमाप्रमाणे महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणारआहे. हे मतदान २६ एप्रिल, ७ मे , १३ मे , २० मे , २५ मे रोजी होईल. बीड लोकसभेसाठी मतदानाची तारीख १३ मे असणार आहे. तर धाराशिव आणि लातूरमध्ये ७ मे रोजी मतदान होईल.
लोकसभा निवडणूकांच्या तारखांच्या निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. आताच झालेल्या पत्रकार परिषदेत आयोगाने निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार देशात ७ टप्प्यात तर राज्यात.५ टप्प्यात मतदान होणार आहे. बीड लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यात म्हणजे १३ मे रोजी मतदान होईल. तर मतमोजणी ४ जून रोजी होणार आहे.
बीड लोकसभेसाठी महत्वाचे दिवस
अधिसूचना: १८ एप्रिल
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत: २५ एप्रिल
छाननी: २६ एप्रिल
अर्ज मागे घेणे: २९ एप्रिल
मतदान: १३ मे
मतमोजणी: ४ जून
बातमी शेअर करा