Advertisement

सफाई कर्मचा-यांच्या मुलांचा परदेशातील शिक्षणाचा खर्च महापालिका करणार

प्रजापत्र | Friday, 15/03/2024
बातमी शेअर करा

 "मुंबई महापालिका  सर्व सुविधा उपलब्ध असणाऱ्या देशातील पालिकांपैकी एक आहे. ⁠क्वालिटी आणि कॅान्टीटीमध्ये काहीच तडजोड नाही. मुंबईचा हिरो सफाई कर्मचारी आहे.त्यामुळे सफाई कर्मचा-यांच्या मुलांच्या परदेश शिक्षणाचा खर्च पालिका करणार आहे", अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ते मुंबईत बोलत होते. 

 

 

  १० हजार कोटी पेक्षा जास्तीचे प्रकल्प कधीच झाले नव्हते. राज्यात आता २ लाख कोटींचे प्रकल्प मुंबई मनपात सुरु आहेत. ⁠मनपाच्या जीवावर इतर लोकांनी खर्च केला. आंचारसंहिता कघीही लागेल म्हणुन कार्यक्रम लवकरात लवकरात करतोय. ⁠मी कॅालेज मधील सर्व ठिकाणी फिरलोय. नायर हॅास्पिटलचे हे कॅालेज ५ star हॅाटेल पेक्षा कमी नाहीये. ॲापरेशन कसे करतात हे देखील मी आता बघितले. ⁠मी पण ॲापरेशन केलेत. ⁠डॅाक्टरेट मला मिळण्याआधीच मी ॲाप्रेशन केलेत, असंही एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना नमूदं केले. 

 

 

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, ⁠लोकांना आता मुंबईत खड्डे बघायला मिळणार नाहीत. आम्ही ⁠प्रदुषण मुक्त मुंबई करणार आहोत. ⁠ग्रीन कव्हर तयार करणार आहोत. शिवाय ⁠मॅन मेड फॅारेस्ट तयार करण्याची तयारी सुरु आहे. २०० एकरमध्ये जागतीक दर्जाचे उद्यान बनवतोय. ⁠रेस कोर्समध्ये घोडे पळायचे आता मुलं पळतील.  गार्डन शहरांची फुप्फुस आहेत. ⁠एक मोठे सेंट्रल पार्क होईल.

Advertisement

Advertisement