भाजपने बुधवारी २० उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीमध्ये बीडमधून पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यावर पंकजा मुंडेंनी स्वत: आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काल उमेद्वारी जाहीर झाली ही माझ्यासाठी सन्मानजनक गोष्ट आहे. पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिली आहे ती मी सन्मान म्हणून स्वीकते, असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.
माध्यमांशी संवाद साधताना दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचीही पंकजा मुंडेंनी आठवण काढली. पंखु कामाला लाग असं आता मुंडे साहेब असते तर बोलले असते. ते आज असते तर मी या आधीच लोकसभा लढले असते. मुंडे साहेब असते तर त्यांची ही प्रतिक्रिया असती. ते असते तर आज मुख्यमंत्री झाले असते आणि मी आधीच या भूमिकेत दिसले असते, अशा भावना पंकजा यांनी यावेळी व्यक्त केल्यात.पक्षाने दिलेल्या प्रतिक्रियेमुळे मनात थोडी समिश्र भावना आहे. कारण १० वेळा प्रितम खासदार होत्या. मी राज्याचं राजकारण पाहिलं पण आता थेट दिल्लीत त्यामुळे थोडं धाकधूक आहे. पक्षाच्या या निर्णयाची मला अपेक्षा नव्हती पण चर्चा खुप दिवस सुरु होत्या. मला असा काय धक्का लागला नाही. प्रितम ताई डाँक्टरीसोडून त्या राजकारणात आल्या. प्रितम खासदार असताना मी पाच वर्ष घरी बसले होते पण एवढा वेळ त्यांचा जाजाणार नाही, असा विश्वास पंकजांनी यावेळी व्यक्त केला.
राजकारण हा मोठा खडतर प्रवास आहे. बीड जिल्ह्याची जनता काय करेल आता हे पाहणं महत्वाचे आहे.मी पण उत्सुक आहे कायकाय होतंय त्यासाठी. धनंजय माझे बंधु पालकमंत्री आहेत. त्यांचा पक्ष आणि आमचा पक्ष युती आहे. त्यामुळे नैसर्गिक आम्ही एकत्र आहोत, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.