बीड दि.१२ (प्रतिनिधी) - गोडाऊनमधून सोयाबीनचे कट्टे चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. हि कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.
बनसारोळा येथील क्रांतीज्योती ॲग्रो प्रोडयुसर कंपनीचे पत्राचे गोडावूनचे पाठीमागील खिडकीचे गज वाकवून आत प्रवेश करून गोडावून मधील सोयाबिनचे एकुण ११४ सुतळी कट्टे वजन अंदाजे ७० क्विंटल चार हजार प्रमाणे एकुण २ लाख ८० हजारांचा माल अज्ञात चोरटयांनी चोरुन नेला होता. याप्रकरणी युसूफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपस करत असतांना पोलिसांना माहिती मिळाली कि, इसम नामे संतोष प्रभाकर कुऱ्हाडे रा. आंकलखोप सुभाषनगर जि.सांगली याने त्याचे आयशर टॅम्पोमध्ये ढोकी ता.जि.धाराशिव येथील त्याचे साथीदारासह मौजे बनसारोळा ता.केज जि.बीड येथील सोयाबीन चोरी केलेली आहे. अशी खात्रीशिर माहिती मिळताच तपास केला असता त्याने व त्याच्या साथीनेच हे कट्टे चोरल्याचे सामोरे आले.
याप्रकरणी दादा उध्दव चव्हाण, महादेव सुरेश चव्हाण या दोघांना ताब्यात घेऊन चोरी गेलेले २ लाख ८० हजाराचे ११४ कट्ट्यांपैकी १ लाख ६५ हजारांच्या किमतीचे ६९ कट्टे परत मिळून दिले. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे, पोउपनि सुशांत सुतळे, रामदास तांदळे, मारुती कांबळे, बाळकृष्ण जायभाये, राजु पठाण, अर्जुन यादव, अश्विनकुमार सुरवसे, अतुल हराळे यांनी केली आहे.