बीड- शहरातील तुळजाई चौकात गावठी कट्टा बाळगणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केला असून, त्याच्याकडून तीन जिवंत काडतुसे कट्ट्यासह हस्तगत करण्यात आले आहे. आरोपी (राहुल प्रकाश तुपे रा.शिरापुर ह.मु.बीड) याला स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे.
अधिक माहिती अशी कि, पोउपनि श्रीराम खटावकर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, राहुल तुपे हा विनापरवाना बेकायदेशीर रित्या तुळजाई चौक येथे कमरेला गावठी कटटा लावून उभा आहे. अशी माहितीवरून पोलीस निरिक्षक स्थागुशा बीड यांनी सदर आरोपीचा शोध घेवून कारवाई करण्याचे आदेश दिले. पोउपपि खटावकर यांनी त्यांचे पथकासह तुळजाई चौक बीड येथून राहुल प्रकाश तुपे वय-27 वर्ष रा.शिरापुर ह.मु.गोंविद नगर बीड यास ताब्यात घेवून त्याचे ताब्यातील कमरेला लावलेली एक गावठी लोखंडी पिस्टल व 03 जिवंत काडतूस असा एकूण 43,000/- रु चा मुद्देमाल मिळून आल असून ते जप्त करण्यात आलेले आहेत. आरोपी विरुध्द पो.ठा. शिवाजीनगर येथे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पो.ठा. शिवाजीनगर व स्थानिक गुन्हे शाखा पथक येथील अधिकारी व अंमलदार करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. संतोष साबळे, पोउपनि श्रीराम खटावकर, पोह मनोज वाघ, प्रसाद कदम, विकास वाघमारे, सोमनाथ गायकवाड, सचिन आंधळे, विकी सुरवसे, नारायण कोरडे, सुनिल राठोड यांनी केली आहे.