Advertisement

वीज चोरीची माहिती देणाऱ्यास बक्षीस तर भ्रष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई......!

प्रजापत्र | Saturday, 02/01/2021
बातमी शेअर करा

 

डी. डी. बनसोडे/केज

मुंबई दि.२ - लॉकडाऊनच्या काळात वाढील वीज बिल लोकांना आली होती. त्यावरून राज्य सरकारवर अजुनही टीका होत आहे. अशातच राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी महावितरणामधील अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

        वीज चोरीला आळा घालण्यासाठी सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागाने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करावा. त्यासोबतच वीज चोरीची माहिती देणाऱ्यांना बक्षीस द्यावं. महावितरणच्या महसूल वाढीसाठी प्रयन करावेत अशा सूचना राचे डॉ. नितीन राऊत यांनी दिल्या.

            वीज चोरीला अभय देणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर त्वरित कारवाई करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या आहेत. मुंबईत झालेल्या एका बैठकीत दिल्या. त्याची अंमलबजावणी स्थानिक पातळीवरही महावितरणकडून सुरू झाली आहे. ज्यात वीज चोरीचे प्रमाण कमी करण्यासाठी थकबाकीपोटी ज्या ग्राहकांचा कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित केला आहे. त्या ठिकाणी जाऊन चौकशी करावी, असंही राऊत यांनी सांगितलं.

Advertisement

Advertisement