Advertisement

भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला दिली मान्यता

प्रजापत्र | Saturday, 02/01/2021
बातमी शेअर करा

देशात आता दोन कोरोना लसींचा आपतकालीन वापर लवकरच सुरू होऊ शकेल. सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) च्या तज्ज्ञ पॅनेलने शनिवारी भारत बायोटेक कोव्हॅक्सिनला कडक निर्बंधासह आपतकालीन वापरासाठी मान्यता दिली आहे.  तज्ज्ञ पॅनेलने एका दिवसापूर्वीच सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्डला आपतकालीन वापरासाठी सशर्त मंजुरी दिली होती. आता दोन्ही लसींना ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात DCGIकडून मान्यता मिळण्याची अपेक्षा आहे.

Advertisement

Advertisement