Advertisement

गायक पंकज उधास यांचं निधन

प्रजापत्र | Monday, 26/02/2024
बातमी शेअर करा

आपल्या जादुई आवाजाने रसिकांच्या मनावर मोहिनी घालणाऱ्या आणि विविध गझल गाणाऱ्या गायक पंकज उधास यांचं निधन झालं आहे. पीटीआयने या विषयीचं वृत्त दिलं आहे. पंकज उधास ७२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. 

गाणी, गझल या प्रांतात स्वच्छंदपणे वावरणारा एक कलाकार काळाच्या पडद्याआड गेला आहे. ‘चिठ्ठी आयी है..’ ही त्यांची गझल अजरामर होती, आहे आणि राहिल यात काही शंकाच नाही. ‘चांदी जैसा रंग हो तेरा सोने जैसे बाल..’ ही गझल ऐकून तर एक पिढी मोठी झाली आहे. या प्रकारचं प्रेम व्यक्त करणारी गझल असो किंवा ‘चिठ्ठी आयी है..’ सारखी विराणी असो त्यासाठी पंकज उधास हे कायमच स्मरणात राहतील.

कॅसेटच्या काळातला हिट गायक
कॅसेटचा काळ असतानाचा सुपरहिट गायक अशी पंकज उधास यांची ओळख होती. ‘ना कजरे की धार’, ‘आज फिर तुमपे प्यार आया है..’ ‘जिये तो जिये कैसे’, ‘और आहिस्ता’ अशी किती तरी गाणी आहेत जी आजही प्रेक्षकांना आठवतात ती त्यांच्या शब्दांमुळे आणि पंकज उधास यांच्या मधुर आवाजामुळे.
पंकज उधास यांचा जन्म १७ मे १९५१ या दिवशी गुजरातमध्ये झाला होता. १९८० ते १९९० च्या दशका ते भारतातील सर्वात लोकप्रिय गझल गायक बनले. त्यांनी त्यांच्या मृदू आवाजाने भारतीयांचे मन जिंकले होते. भारतातच नाही तर परदेशात देखील त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे.

Advertisement

Advertisement