Advertisement

 बीडमध्ये  दोन मोटरसायकलींचा भीषण अपघात  

प्रजापत्र | Tuesday, 20/02/2024
बातमी शेअर करा

बीड- शहरातील  बशीरगंज परिसरातील फेमस बिर्याणी हॉटेलचे मालक हारूण कुरेशी यांचा मुलगा सोहेल कुरेशी (वय २०) याचे काल रात्री बार्शी रोडवरील शासकीय दुध डेअरीजवळ अपघाती निधन झाले.

 

बीड शहरातील मोमीनपुरा भागातील रहिवाशी तथा फेमस बिर्याणी हॉटेलचे मालक हारूण कुरेशी यांचा मुलगा सोहेल कुरेशी मित्रासह मोटारसायकल क्र.एम.एच.२३ बी.डी. ३४५३ वरून मांजरसुंब्याकडून बीडकडे येत होता. त्याचवेळी बार्शीनाक्याकडून पालीच्या दिशेने जाणारी मोटारसायकल एम.एच.२३ बी.एफ.६०८६ या दोन्ही मोटारसायकलींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात सोहेल हारूण कुरेशी याचा गंभीर मृत्यू झाला. तर त्याच्यासोबतचा सोफीयान कुरेशी हा गंभीर जखमी झाला आहे. 

Advertisement

Advertisement