Advertisement

चार जिल्ह्यात आज होणार कोरोना लसीकरणाची सराव फेरी

प्रजापत्र | Saturday, 02/01/2021
बातमी शेअर करा

मुंबई : भारतात कोरोनावरील लसीला परवानगी मिळाल्यानंतर आता प्रत्यक्ष लसीकरणाची सुरुवात करण्या अगोदर महाराष्ट्रातील चार जिल्ह्यात या लसीकरणाची सराव फेरी ठेवण्यात आली आहे.

          केंद्र सरकारकडून आजपासून (२ जानेवारी) देशातील प्रत्येक राज्यात करोना वॅक्सीनच्या पार्श्वभूमीवर ‘ड्राय रन’ (सराव फेरी) घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांची या ‘ड्राय रन’साठी निवड केली गेली आहे. ज्यामध्ये पुणे, नागपूर, नंदुरबार व जालना या जिल्ह्यांचा समावेश आहे.

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सांगितल्यानुसार, सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेशांच्या एकूण ११६ जिल्ह्यांमध्ये २५९ जागांवर आज COVID-19 वॅक्सीनसाठी ‘ड्राय रन’ घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी माहिती देताना सांगितले की, ‘ड्राय रन’साठी संपूर्ण तयारी झालेली आहे. यासाठी विविध पथकांची निर्मिती केली गेली आहे.

Advertisement

Advertisement