Advertisement

सुभाषरोडवर आढळला मृतदेह

प्रजापत्र | Wednesday, 14/02/2024
बातमी शेअर करा

बीड - शहरातील सुभाष रोडवरील बाफना साडी सेंटरच्या बाजूला दुपारच्या सुमारास अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला. शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन सदरील मृतदेह ताब्यात घेतला असून सदरील व्यक्ती कोण आणि कशामुळे मृत्यू झाला याबाबत अद्याप समजू शकले नाही.

 

 

  शहरातील सुभाष रोडवरील बाफना साडी सेंटरच्या नाल्यामध्ये नगर पालिकेचे कर्मचारी साफसफाई करत असताना जेसीबीला अडकून मृतदेह वरती आला. त्यानंतर कर्मचारी सदरील मृतदेह वरती काढल्यानंतर पाहणी केली असता मृतदेह हा पूर्णपणे सडलेला आढळून आला असून याबाबत तात्काळ शहर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी करून सदरील मृतदेह जिल्हा रूग्णालयाकडे घेऊन गेले असून सदरील मृतदेह कोणाचा आहे याबाबत पोलीस तपास घेत असून किती दिवसापासून मृतदेह नालीमध्ये पडलेला असावा याबाबतही तर्क वितर्क लावले जात आहेत.

Advertisement

Advertisement