बीड- राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेची तात्काळ अंमलबजावणी करत मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाीं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तिसर्या टप्प्यातले उपोषण आंदोलन सुरू केले असून आज उपोषणाच्या चौथ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे मराां समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सकळ मराठा समाजाच्या वतीने उद्या महाराष्ट्रात बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे बीड जिल्हा कडकडीत बंद राहणार आहे. गेवराईत उद्याचा बाजार बंद ठेवण्यात येणार असून वडवणीतला आठवडी बाजारही बंद ठेवण्यात येणार आहे. बीड, आष्टी, पाटोदा, शिरूर, माजलगाव, परळी, अंबाजोगाई, केज, धारूरसह ग्रामीण भागातही मराठा समाजाच्या वतीने बंद पुकारण्यात आल्याचे सांगण्यात येते. ही बंदची हाक मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली आहे. दुसरीकडे मनोज जरांगेंची प्रकृती पाहता मराठा समाजाने सराटी अंतरवलीत पाटील पाणी तरी घ्या म्हणत ठिय्या सुरू ठेवला आहे.
बातमी शेअर करा