Advertisement

हा तर लोकशाहीचा लिलाव........!

प्रजापत्र | Friday, 01/01/2021
बातमी शेअर करा

मुंबई दि.१ - कांही ग्रामपंचायतींनी सरपंचाच्या पदाचा लिलाव करून बोली लावल्याची निदर्शनास आले आहे. वास्तविक पाहता हा सरपंच पदाचा लिलाव नसून लोकशाहीचा लिलाव केला आहे, अशा शब्दात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी याला विरोध केला आहे.

           ज्यांनी देशात लोकशाही यावी यासाठी प्राणांचे बलिदान केले त्यांचे बलिदान व्यर्थ झाले आहे काय? किंवा 70 वर्षात काही लोकांना लोकशाहीचा अर्थ समजला नाही की काय?, असा सवाल अण्णा हजारे यांनी केला आहे.

ग्रामपंचायत सरपंच पदाचा लिलाव झाला तर लोकसभा आणि विधानसभा कमजोर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण ज्या आमदार आणि खासदार यांना ग्रामसभेने निवडून पाठवलं असल्याने आणि लिलाव पद्धतीने निवड झाल्यामुळे काही गुंड, भ्रष्टाचारी, व्यभिचारी लोक त्या पवित्र मंदीरामध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.

Advertisement

Advertisement