Advertisement

 हातभट्टी दारू तयार करणाऱ्याची हर्सूलला रवानगी 

प्रजापत्र | Tuesday, 06/02/2024
बातमी शेअर करा

बीड दि.६ (प्रतिनिधी) - हातभट्टी दारू बनवून विक्री करणाऱ्या बबन शामराव पवारची MPDA कायद्याअंतर्गत हर्सूलला रवानगी करण्यात आली आहे. 
बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक  नंदकुमार ठाकुर यांनी शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत, बीड जिल्ह्यातील गुंडगिरीचे व वाळु माफीयाचे तसेच हातभट्टीचे दारु तयार करुन विक्री करणाऱ्याचे समुळ उच्चाटन करण्याचा उदात्त दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवुन MPDA कायद्या अंतर्गत बऱ्याच गुन्हेगारांवर व गुंडावर कार्यवाही करण्याचे योजिले आहे. या पार्श्वभुमीवर पोलीस अधीक्षक, बीड यांचे सुचनेवरुन तत्कालीन स.पोलीस निरीक्षक विलास हजारे यांनी  बबन शामराव पवार वय ५० वर्षे रा. नेकनुर ता. जि. बीड याचे विरुध्द MPDA कायद्याअंतर्गत स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक बीड यांच्या मार्फतीने जिल्हादंडाधिकारी साहेब बीड यांना सादर केला होता.

 

 

सदर स्थानबध्द इसमा विरुद्ध पोलीस ठाणे नेकनुर येथे हातभट्टीची दारू तयार करणे, जवळ बाळगणे, चोरटी विक्री करणे, गांजा विक्री करणे वगैरे स्वरुपाचे ०८ गुन्ह्याची नोंद पोलीस अभिलेखावर आहे. त्यापैकी ०७ गुन्हे न्यायप्रविष्ट असुन ०१ गुन्हा पोलीस तपासावर आहे. सदरील इसम हा हातभट्टीची गावठी दारू तयार करुन तिचा चोरटा व्यापार करीत असल्याने पोलीसांची त्याचेवर बऱ्याच दिवसांपासून करडी नजर होती. सदर इसम हा पोलीसांची नजर चुकवुन हातभट्टीच्या दारुचा व गांजाचा (मादक पदार्थ) चोरटा व्यापार करीत होता, सदर इसमावर यापूर्वी महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 93 प्रमाणे प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली होती. परंतु सदर इसम हा प्रतिबंधक कारवाईस न जुमानता पुन्हा जोमाने हातभट्टीची दारू तयार करुन, ताब्यात बाळगुन तिची चोरटी विक्री करण्याचे गुन्हे करण्याचे चालुच ठेवुन होता. त्यामुळे नेकनुर परिसरातील सर्वसामान्य नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला होता.

 

 

सदर प्रकरणात दिपा मुधोळ मुंडे, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी बीड यांनी दिनांक  एम.पी.डी.ए. कायद्याअंतर्गत आदेश पारीत करून सदर इसमास तात्काळ ताब्यात घेवून हर्मुल कारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे हजर करून स्थानबध करणे बाबत आदेश पारीत केले होते. त्यानंतर पोलीस अधिक्षक बीड यांनी सदर इसमास तात्काळ ताब्यात घेवून कार्यवाही करण्याच्या सुचना पो. नि. संतोष साबळे स्थागुशा व सपोनि चंद्रकांत गोसावी पो. स्टे. नेकनुर यांना दिल्या होत्या, त्यांनी गोपनिय खबऱ्याचे आधारे संयुक्तरीत्या ताबे पोलीस अंमलदार यांचे मार्फतीने सदर इसमास ताब्यात घेवुन योग्य पोलीस बंदोबस्तात हर्मुल कारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे दिनांकआज ४ वाजता हजर करून स्थानबध्द केले आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, अपर पोलीस अधीक्षकचेतना तिडके, उप.वि.पो.अ. तथा सपोअ कमलेश मीणा, संतोष साबळे, नि. स्थागुशा बीड, यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि चंद्रकांत गोसावी, सपोनि श्री. विलास हजारे, पोउपनि गट्टेवार, पोह/राख, क्षीरसागर, शेलार, उबाळे सर्व पो. स्टे. नेकनुर व बीड स्थागुशा चे पोउपनि सुतळे पोलीस हवालदार अभिमन्यु औताडे, कांबळे, जायभाये, यादव व पठाण हराळे यांनी केलेली आहे. भविष्यातही हातभट्टीची दारु तयार करणारे, विक्री करणारे व वाळुचा चोरटा व्यापार करणारे तसेच जिवनावश्यक वस्तुचा काळाबाजार करणारे व्यक्ती यांचेवर व दादागिरी करणाऱ्या व खंडणी बहादर गुंडावर जास्तीत जास्त एम.पी.डी.ए. कायदयाअंतर्गत कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर यांनी दिले आहेत. 
 

Advertisement

Advertisement