दिल्ली : देशातील आघाडीवर असलेली टेलिकॉम कंपनी Jio ने आपल्या ग्राहकांसाठी नवीन वर्षाचे एक भन्नाट गिफ्ट दिले आहे. येत्या १ जानेवारी पासून jio च्या सर्व कॉल कॉलिंग आता फ्री होणार आहेत.
1 जानेवारीपासून देशात सर्व नेटवर्कसाठी पुन्हा एकदा कॉलिंग सेवा विनामूल्य केली आहे.जिओने IUC म्हणजेच पूर्णपणे बंद केले आहेत. त्यामुळे जिओ ग्राहकांना आता 1 जानेवारीपासून कोणत्याही नेटवर्कवर विनामूल्य कॉलिंग करता येणार आहे. रिलायन्स जिओने गुरुवारी याबाबत माहिती दिली. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या निर्देशानुसार, देशात १ जानेवारी २०२१ पासून Bill and Keep नियम लागू होणार आहे. त्यामुळे IUC चार्ज संपणार आहे. जिओनेही ग्राहकांना पुन्हा एकदा विनामुल्य कॉलिंगची सेवा मिळेल असं स्पष्ट केलं.सध्या जिओकडून अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी IUC चार्ज आकारला जातो. यासाठी जिओ दर मिनिटाला 14 पैसे आकारत होती, नंतर 7 पैसे आकारले जात होते. पण आता हा चार्ज हटवण्यात आला असून विनाशुल्क कॉलिंग 1 जानेवारीपासून करता येणार आहे.
हेही वाचा